माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक, पहा काय दिले होते अकाऊंटला नाव

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. अशी माहिती मंत्र्यालाया कडून मिळत  आहे. काही दिवसां पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट देखील हॅक झाले होते. मोदींच्या अकाउंट वरून ट्विट करत. केंद्र सरकारने ५०० बिटकॉइन विकत घेतले आणि बिटकॉइनला भारतात अधिकृत मान्यता देण्यात अली आहे अशी भ्रामक माहिती देण्यात अली होती.

तसचे १२ जानेवारी रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक करून चक्क नाव आणि प्रोफाइल फोटो देखील बदलले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यावर म्हणाले कि, “१२ जानेवारी रोजी ट्विटर अकाऊंट सोबत छेडछाड झाली. ट्विटर अकाऊंटच नाव बदलून एलोन मास्क तर प्रोफाइल फोटोवर माश्यांचा फोटो लावला होता. आता ते अकाऊंट पुनः मिळवण्यात यश आले आहे.” अशी माहिती, माहिती आणि प्रसार मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *