मंत्री शंकरराव गडाख याच्या स्विय सहाय्यकावर गोळीबार

अहमदनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने अहमदनगर शहरात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगावजवळ रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला आहे, राहुल राजळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून . अहमदनगर शहराच्या मॅक्स केअर रुग्णालयात राहुल राजळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय मतभेदातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. चार-पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा :- आमदार खासदार असले म्हणून काहीही करण्याचे स्वातंत्र्य नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या गाडीने घरी जात होते. घोडेगाव नजीक त्यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहुल राजळे यांच्या पायाला या हल्ल्यात गोळी लागली लागली . हल्ला राजकीय मतभेदातून झाल्याची शक्यता आहे. राहुल राजळे यांच्यावर हल्ला कुणी केला आणि कश्यासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :- मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी ; रवी राणा मातोश्रीवर जाण्यास ठाम

हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांनी जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *