मंत्री नवाब मलिक ईडीच्या रडारवर ! शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याची अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
सत्याची भूमिका मांडणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम सुरू असून त्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे शरद पवार बोलले. मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचा माणूस असे म्हटले जाते. तसेच अशाप्रकारे यंत्रणांचा वापर करून कारवाई होत असल्याची शरद पवार यांनी मत व्यक्त केले.
यंत्रणांचा गैरवापर केला जातो याचं हे उदाहरण आहे. नवाब मलिक जाहीरपणे बोलतात त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. यामुळे अधिक भाष्य करण्याची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे ? कसली केस काढली त्यांनी ? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदचा माणूस म्हणतात. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी देखील माझ्यावर आरोप करण्यात आले होते. असंच वातावरण तयार करण्यात आले होते. केंद्र सरकार किंवा एजन्सी बद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करून त्रास दिला जातोय, अशी टीका शरद पवार यांनी केली.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडी कडून कारवाई सुरू आहे. नवाब मलिक याना यापूर्वी समन्स पाठवण्यात आले होते. तसेच ईडीचे अधिकारी सकाळी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर नवाब मलिक ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्याची माहिती मिळाली आहे.