‘मे’ महिन्यात २०८ नगरपालिकांच्या निवडणुका.?

राज्यात मुदत संपलेल्या किंवा लवकरच संपणार असलेल्या २०८ नगरपालिकांमध्ये निवडणूक घेण्याच्या दृष्टीने आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम मंगळवारी जारी केला. ही बाब लक्षात घेता एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येऊ शकते किंवा मे मध्ये निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नाशिक, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांची नगरपालिकांच्या यात समावेश आहे.

मे २०२० चे फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या अ वर्गातील एकूण १६, मे २०२० फेब्रुवारी २०२२ या दरम्यान मुदत संपत असलेल्या ६७ तसेच ९ मार्च २०२२ रोजी मुदत संपत असलेल्या अशा वर्गाची ६८ आणि एप्रिल २०२० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या क गटातील १२० तसेच नवनिर्मित चार नगरपंचायतीच्या निवडणुका नजीकच्या काळात आहेत.

नागरिकांच्या आलेल्या हरकती व सूचना यावर संबंधित जिल्हाधिकारी सुनावनी देणार असून त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील तसेच त्याआधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल.

१० मार्च ते १७ मार्च पर्यंत हरकती व सूचना देता येतील त्यावर जिल्हाधिकारी २२ मार्च रोजी सुनावणी देणार आहेत. २५ मार्चपर्यंत आयोगाला अहवाल देतील १ एप्रिल पर्यंत आयोगांची प्रभाग रचनेला मान्यता मिळेल त्याच सुमारास अनुसूचित जाती जमाती आणि महिला आरक्षण जाहीर केले जाईल. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *