मनोरंजन

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सह-व्यवस्थापकीय यांची भेट,या विषयांवर झाली सविस्तर चर्चा

Share Now

13 फेब्रुवारी रोजी फिल्म सिटी येथील महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सह-व्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी आणि राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने एक सदिच्छा भेट घेतली आणि काही मागण्या आणि मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली.
भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष समीर दीक्षित, संपर्कप्रमुख चंद्रकांत विसपुते आणि सरचिटणीस नितीन कोदे हे उपस्थित होते.
तर राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग यांच्याकडून अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष रीमा रंजन आणि मीरा भाईंदर चे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे शहर प्रमुख रोहित गुप्ता उपस्थित होते.

भाजपच्या चित्रपट आघाडीची मोठी कामगिरी.. तंबु चित्रपट मालकांच्या समस्या सोडवण्यात आले यश!

या महत्त्वाच्या झालेल्या चर्चा मध्ये खालील काही मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून पाटील यांनी त्याला संपूर्ण सहकार्य आणि पुढे नेण्यास सांगितले
1) चर्चेचा एक प्रमुख विषयांमध्ये महाराष्ट्रातील मराठी चित्रपटाला देणाऱ्या अनुदान विषयी बोलताना अनेक योग्य आणि सामाजिक दर्जा असणाऱ्या चित्रपटांना अनुदानापासून वंचित ठेवले जाते आणि चित्रपटाला योग्य तो अनुदान मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. आणि अनुदान करता अ,ब आणि क एक तिसरा वर्ग 15 लाखाचा अशी मागणी पण करण्यात आली.
2) अधिकांश अग्रगण्य ओटीटी चॅनल जसं नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, VOOT, हॉटस्टार इत्यादी ओटीटी चॅनल मराठी चित्रपट घेण्यास सपशेल नकार देतात मात्र इतर प्रादेशिक भाषा जसं तमिल, तेलुगु कन्नडा इत्यादी भाषेतल्या चित्रपट आवर्जून विकत घेतात असे का ? शिष्टमंडळाने मागणी केली की सांस्कृतिक मंत्री आणि अधिकाऱ्यासमवेद ओटीपी चॅनलचे प्रमुख अधिकाऱ्यांना एका मीटिंग करता बोलवण्यात यावे आणि याविषयी जाब विचारला पाहिजे. याचबरोबर काही मध्यस्थ्यांच्या मार्फत मराठी चित्रपट OTT करता घेतले जातात हे अत्यंत चुकीचे आहे.

प्रभु श्रीराम पर आधारित,भारत के पहले हिंदी पोवाडे के रिकॉर्डिंग का उद्घाटन मा.श्री संजय केनेकर द्वारा किया गया!


3) मराठी चित्रपट अनुदान समिती सदस्यांची संख्या वाढवून त्याला सर्वसमावेशक असं रूप दिले पाहिजे.
4) स्क्रीनिंग चार्जेस (VPF) याची मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट मधली तफावत दूर करण्यात आली पाहिजे.
5) फिल्म सिटी येथील नाईट शिफ्ट करणाऱ्या कामगार कलाकार आणि तंत्रज्ञांना काम संपल्यानंतर घरी जाण्याकरता फिल्म सिटी ने काही व्यवस्था केली पाहिजे. त्याचप्रमाणे फिल्म सिटी मध्ये एका सेटवरनं दुसरीकडे जाताना लांब असल्यामुळे बॅटरी ऑपरेटेड छोट्या गाड्यांची सोय करणे पण आवश्यक आहे.
6) चित्रपटाशी संबंधित कामगार युनियन ला एक हक्काचे ऑफिस फिल्म सिटी मध्ये असावे त्यामुळे कामगार आणि इतर लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल.

7) मराठी सिनेमाला मिळणाऱ्या थेटर चा प्रश्न सोडवण्याकरता , कमिटी बनवून त्याकडे चांगल्या मराठी सिनेमाला योग्य ते थेटर मिळतील असा नियम बनवणे केव्हा व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
8) सरकारतर्फे होणाऱ्या चित्रपट महोत्सव आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता चित्रपट कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रण मिळायला पाहिजे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *