भाजपच्या चित्रपट आघाडीची मोठी कामगिरी.. तंबु चित्रपट मालकांच्या समस्या सोडवण्यात आले यश!

राज्यात अनेक ठिकाणी यात्रा -जत्रा दरवर्षी भरवल्या जातात. जत्रा-यात्राचे मुख्य आकर्षण म्हणजे तंबुतील चित्रपट. तंबुतील चित्रपटांचा आनंद घेणा-यांची संख्या जेवढी अधिक आहे तेवढ्याच चित्रपट दाखवणा-या तंबु मालकांच्या समस्यांची संख्या ही अधिक आहे इतरांना करमणुकीच साधन उपलब्ध करून देणा-या तंबु मालकांच्या समस्या अनेक वर्षा पासून दृष्टी आड होत्या भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीने त्यांच्या व्यर्था समस्या जाणून घेतल्या. मराठवाड्या सारख्या परिसरातील चित्रपट तंबु मालकांच्या एकत्रितकरणाला समीर दिक्षित यांनी सुरूवात केली.

प्रभु श्रीराम पर आधारित,भारत के पहले हिंदी पोवाडे के रिकॉर्डिंग का उद्घाटन मा.श्री संजय केनेकर द्वारा किया गया!

भारतीय जनता पक्ष चित्रपट कामगार मोर्चा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, अध्यक्ष समीर दिक्षित यांनी नुकतीच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेतली, तंबु चित्रपट मालकांच्या विविध समस्या मांडल्या त्वरीत निवेदनातील मुद्दे निकाली निघतील असे आश्वासन राज्य मंत्री यांनी दिले. मागील सहा महिन्यापासून चित्रपट आघाडी यावर काम करत आहे .आपल्या महाराष्ट्र राज्याला लोक कला, लोक संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे.

प्रभू श्रीरामावर आधारित देशातील पहिल्या हिंदी पोवाड्याच्या रेकॉर्डिंगचे उदघाट्न मा.श्री .संजय केनेकर यांच्या हस्ते!

दिक्षित यांनी विविध ठिकाणं विखुरलेल्या तंबु मालकांशी वारंवार संपर्क -संवाद साधून सगळ्यांना एकत्रित केले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात ऑगस्ट (२०२३ ) महिन्यात मेळावा घेत त्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. पहिल्यांदाच कुणीतरी आपल्या समस्या जाणून घेत आहेत या भावनेने भारावून गेलेल्या तंबु मालकांनी दिक्षित यांचे मनापासुन आभार मानले होते. तंबु मालकांचा विषय चित्रपट कामगार आघाडीने लावून घरला विजय हरगुडे नी विषयांची सविस्तर मांडणी करत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वाक्षरीचे पत्रक मिळवले.संजय धाडवे( सचिव चित्रपट कामगार आघाडी) यांचे विशेष प्रयत्न होते .आता चित्रपट तंबु मालकांच्या समस्यांचे निराकारण होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडी चे हे यश आहे पण विजय हरगुडे तसेच समीर दिक्षित यांच्या सातत्य पुर्ण पाठपुराव्याचे हे श्रेय आहे. अनेक वर्ष दृष्टी आड अश्या चित्रपट तंबु मालकांच्या समस्या अखेरीस भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीने सोडवल्या अशी भावना आज अनेक तंबु चित्रपट मालकांच्या मनात निर्माण झाली आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *