दिल्लीतील बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या
मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एका कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे. मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पुढील राष्ट्रपती कोण ? ‘हे’ तीन नावे येत आहे समोर
म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे
कापूस शेती : कापसाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट, राज्यात अनोखे अभियान सुरू
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे. हि देशातील सामूहिक आत्महत्याची दुसरी घटना आहे,
बुरारी सामूहिक आत्महत्या
1 जुलै 2018 रोजी राजधानी दिल्लीतील बुरारी येथे एकाच घरात 11 जणांनी गळफास लावून घेतला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सर्वांचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, घरातील 11 पैकी 10 सदस्यांचा फाशीमुळे मृत्यू झाला, तर 11 व्या सर्वात ज्येष्ठ सदस्य नारायणी देवी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. लटकून मृत्युमुखी पडलेल्या 10 सदस्यांच्या मृतदेहावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या, परंतु काहींच्या मान तुटल्या होत्या. एवढेच नाही तर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि हात पायही बांधले होते. तसेच या आत्महत्येचे कारण अंधश्रद्धा आहे असे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होत आहे.