रेणू शर्मावर आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुडेंना ब्रेनस्ट्रोक

रेणू शर्मा हिने केलेल्या मानसिक छळामुळे मुंडे यांना मानसिक तणाव आला आणि त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता असे गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. रेणू शर्मा खंडणी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी किल्ला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पोलिसांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा वैद्यकीय अहवाल जोडला आहे.

दिल्लीतील बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने रेणू शर्मा हिच्यावर ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी २० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करत तिला इंदूर येथून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात शनिवारी गुन्हे शाखाने किल्ला न्यायालयात शनिवारी आरोपपत्र दाखल केले आहे. रेणूकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नसतांना तिच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले होते. पोलिसांनी सांगितले की, बँकेच्या ओशिवरा शाखेत २०१७ मध्ये उघडलेल्या एका खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा ओघ दिसून आला असे आरोपपत्रात म्हटले आहे.

किसान क्रेडिट कार्ड: KCC 15 दिवसात मिळणारच, दिले नाही तर येथे करा तक्रार

रेणू शर्माकडून होणारा सततचा छळ आणि खंडणीच्या मागणीमुळे मुंडे यांना नैराश्य आले होते. त्यांना १२ ते १६ एप्रिल दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आम्ही त्यांचा वैद्यकीय अहवाल,”रुग्णालयाची कागदपत्रे जोडली असल्याचे गुन्हे शाखेने आरोपपत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *