क्राईम बिटमहाराष्ट्र

विवाहितेची ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

Share Now

पुणे : पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह लावून दिला असतानाही लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही म्हणून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पतीसह निवृत्त प्राध्यापक असलेल्या सासऱ्याला अटक केली आहे.

हेही वाचाः आनंदाची बातमी : देशातील 14 कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खत अनुदान वाढवणार मोदी सरकार

दिव्या तरुण कानडे (वय २४), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तरुण मदन कानडे (३०) आणि मदन कानडे (६२, रा. नवरत्न एक्झोटिका सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सपना कानडे (५७) आणि दीर अरुण कानडे (२६) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिचे वडील शामराव आनंदा बनसोडे (५०, रा. धानेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : औरंगाबाद शहरात मोठी कारवाई ; किराणा दुकानातून हवाला रॅकेटचे १ कोटी ९ लाख पकडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्याचा विवाह १ जानेवारी २०२१ रोजी तरुण याच्याशी औरंगाबाट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला होता. तरुण एमबीए झाला असून, पुण्यातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे.

वडील मदन कानडे औरंगाबादमधील महाविद्यालयात प्राध्यापक होते. गेल्या दिवाळीपासून दिव्याचा छळ सुरू झाला. लग्नात मानपान केला नाही, म्हणून तिच्याकडे पैशांची व सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली जाऊ लागली. बनसोडे यांना दोन मुली आहेत. त्यावरून दिव्या हिला तुझा बाप श्रीमंत आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्याला कोठे मुलगा आहे. अर्धी मालमत्ता तुझ्या नावावर करायला सांग म्हणून छळ सुरू केला.

दिव्या हिचा मेसेज मिळाल्याने बनसोडे हे गुरुवारी स्वतः पुण्यात येऊन भेटले. त्यांनी तुमचे काय म्हणणे आहे, ते सांगा, असे विचारले. तेव्हा दोघांनीही आमची काही मागणी नाही, अशी सारवासारव केली. त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याने कंटाळून दिव्या हिने सोमवारी सकाळी इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *