महाराष्ट्र CET MBA अभ्यासक्रमाचे हॉलतिकीट प्रसिद्ध, पहा कसे मिळेल ऑनलाईन

MAH CET 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी MAH CET 2022 परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. एमबीए अभ्यासक्रमासाठी हे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. एमबीएसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक पुढे दिली आहे.

नवाब मलिकांना धक्का, समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप चुकीचा ठरला

MAH CET 2022 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

  • cetcell.mahacet.org येथे महाराष्ट्र CET 2022 परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
  • होमपेजवरील ‘MAH CET 2022 2022 View Admit Card’ या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
  • तुमचे MAH CET 2022 प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • आता तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि हॉल तिकिटाची प्रिंटआउट घेऊ शकता.
  • MAH CET 2022 MBA प्रवेशपत्र डाउनलोड करा

भारतातून बासमती तांदूळ निर्यातीत झपाट्याने वाढ, दोन वर्षांनंतर सर्वेक्षणाचे काम सुरू

या गोष्टी लक्षात ठेवा

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे हॉल तिकीट काळजीपूर्वक वाचावे. तुमची सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. जर काही चुकीची माहिती दिली गेली असेल तर ती विभागाकडून सुधारली जाऊ शकते. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र सोबत ठेवण्याचे लक्षात ठेवा. हॉल तिकीटाशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

असे प्रश्न परीक्षेत विचारले जातील

MAH MBA CET किंवा MAH MBA/MMS CET 2022 महाराष्ट्रातील विविध राज्य महाविद्यालयांमध्ये MBA अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेण्यात येईल. या सामायिक प्रवेश परीक्षेत लॉजिकल रिझनिंग, अ‍ॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि व्हर्बल एबिलिटी आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन या विषयांमधून प्रश्न विचारले जातील. यापूर्वी महाराष्ट्र बीएड परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. 23 ऑगस्टपासून एमबीएची परीक्षा सुरू होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *