लवकरचं डिजिटल पेमेंट होणार “ऑफलाईन”!

भारतात अनेक क्षेत्रात आजही इंटरनेट सुविधा नाही.ग्रामीण आणि शहरांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी केलंय . RBI ने डिजिटल पेमेंटला मान्यता दिली .सध्या, ऑफलाइन पेमेंट अंतर्गत 200 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना परवानगी असून यामध्ये, जास्तीत जास्त 10 व्यवहार म्हणजेच एकूण 2,000 रुपयांपर्यंत ऑफलाइन व्यवहारांना परवानगी असेल.

ऑफलाइन डिजिटल पेमेंट म्हणजे ज्यामध्ये इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क आवश्यक नसते, यामध्ये ऑफलाइन पेमेंट कार्ड, वॉलेट आणि मोबाइल यासह कोणत्याही माध्यमातून समोरासमोर करता येते. आरबीआयने म्हटले आहे की अशा व्यवहारांसाठी ‘अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (AAF) आवश्यक नाही. यामध्ये पेमेंट ऑफलाइन होणार असल्याने ग्राहकांना थोड्या अंतरानंतर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे अलर्ट मिळतील.

ऑफलाईन पेमेंट म्हणजे काय ?
ऑफलाइन डिजिटल पेमेंट म्हणजे असा व्यवहार ज्यासाठी इंटरनेट किंवा टेलिकॉम कनेक्टिव्हिटीची आवश्यकता नसेल.ऑफलाइन मोडमध्ये, कार्ड, वॉलेट्स आणि मोबाईल उपकरणांसारख्या कोणत्याही माध्यमातून समोरासमोर पेमेंट करता येईल.

आरबीआयने जारी केलेल्या फ्रेमवर्कनुसार, ‘यामधील प्रत्येक व्यवहाराची मर्यादा 200 रुपये असेल. त्याची एकूण मर्यादा 2,000 रुपये असेल, ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर 2020 ते जून 2021 दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँके नुसार ‘कमकुवत इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात ऑफलाइन पेमेंट डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देईल. विशेषतः ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये ही व्यवस्था तात्काळ लागू करण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकांद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलं, की ऑफलाइन पेमेंटचा वापर ग्राहकांच्या परवानगीनंतरच केला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *