लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, उषा मंगेशकरांनी दिली माहिती
मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय ९२ वर्ष आहे, त्यामुळे होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI
(file photo) pic.twitter.com/8DR3P0qbIR
— ANI (@ANI) January 11, 2022
दरम्यान, उषा मंगेशकर यांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या म्हणाल्या, ” दीदींची तबियत आता बारी आहे. त्या आता लोकांसोबत बोलू शकतात. मात्र डॉक्टरांनी त्यांना बोलणे टाळण्याचे सांगितले आहे. अशी माहिती उषा मंगेशकरांनी दिली तसेच, मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. डॉ. प्रतित समदानी आणि त्याची टीम दीदींवर उपचार करत आहे. ते देखील म्हणाले की, ” सध्या दीदींची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.” असे ते म्हणले.