कश्यप गॅंगसारख्या टोळ्या संपवू; पोलीस आयुक्तांचे आश्वासन!

औरंगाबाद : शहरातील काही भागात गुंड दुर्लभ कश्यपच अनुकरण करत गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. काही दिवसांपूर्वी याच गँगच्या काही तरुणांनी एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याच्या बातम्या आता सर्वच माध्यमांनी लावून धरल्यानंतर पोलीस आता एक्शन मोडमध्ये आल्याचं बघायला मिळत आहे.

पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले, याच भागात नव्हे तर शहरातील कोणत्याही भागात गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण तयार होत असतील तर पोलिसांना त्वरीत याची माहिती कळवा. अवघ्या काही तासात अशा गुंडांवर लगाम घातला जाईल. तसेच पुंडलिक नगरातील गुन्हेगारांचाशहरातील कोणत्याही भागात गुंड त्रास देत असल्यास नागरिकांनी 112 या हेल्पलाइन क्रमांकावर कळवावे. काही तासात पोलीस तेथे हजर होतील,  परिसर पोलिसांनी तसेच दामिनी पथकानेही पिंजून काढावा असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

गुन्हेगारी संपविण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित असल्याचं निखील गुप्ता यांनी सांगितले आहे. असे आश्वासन पोलीस आय़ुक्तांनी दिले आहे. तसेच गुन्हेगारांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘गुन्हेगार दत्तक योजना आखली आहे. मागील तीन वर्षात हल्ला व चोऱ्यांसारखे गंभीर गुन्हे केलेल्या २५१४ गुन्हेगारांच्या हालचालीवर या योजनेतंर्गत लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अंमलदारांपासून अधिकाऱ्यांना कमीत कमी 3 गुन्हेगार दत्तक दिले आहेत. या योजनेमुळे गुन्हेगारांच्या हालचालीसह गुन्हे उघड होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *