कालीचरण महाराजांना जामीन मंजूर
कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने यांच्याविरोधात महाराष्ट्र् , मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कालीचरण महाराजांना मध्यप्रदेश खजुराहो येथे ३० डिसेंबर रोजी बागेश्वरी धाम येथे अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी पुणे येथील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रायपूर येथून अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता, गुरुवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.