इन्स्टावाली लव्ह स्टोरी, भंडाऱ्याहून तरुणी नांदेडला आली पण प्रियकर काही भेटला नाही

प्रेमासाठी काय करतील याचा नेम नसतो , असं उदाहरणं एका प्रकरणात समोर आलं. सोशल मीडियावरून एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतलेली भंडारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलगी नांदेडात आली परंतु दिवसभर वाट पाहूनही तिचा प्रियकर आलाच नाही.

ही बाब काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना कळविली. त्यानंतर वजिराबाद पोलिसांनी मुलीचे समुपदेशन करून तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुले-मुली जास्त प्रमाणात असल्याचे दिसते. कुटुंबीयांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही मुले वाकडे पाऊल टाकत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील एका गावातील बीएस्सी प्रथम वर्षाला असलेली अल्पवयीन मुलीचे इन्स्टाग्रामवर नांदेडातील तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.

चार लग्ने झाली, एक बायकोचा मृत्यू, तीन बायकांना त्रासलेल्या नवऱ्याने केली आत्महत्या

त्यानंतर तरुणाने प्रेयसीला भेटीसाठी नांदेडला बोलाविले, मुलीनेही मागचा पुढचा विचार न करता घरातून पळ काढत रविवारी सकाळी नांदेड गाठले. दिवसभर ही मुलगी नांदेडच्या बसस्थानकावर प्रियकराची वाट पाहत बसली होती; परंतु प्रियकराकडून मात्र प्रतिसाद मिळत नव्हता.

मुलगी एकटीच दिवसभर बसल्याचे पाहून काही जणांनी वजिराबादचे पोनि. जगदीश भंडरवार यांच्याशी संपर्क साधला. भंडरवार यांनी लगेच त्या ठिकाणी पोउपनि प्रवीण आगलावे, धोंडीराम केंद्रे, संतोष बनसोडे, मीनाक्षी हासरगोंडे यांना पाठविले. आगलावे यांनी अत्यंत नाजूकपणे हे प्रकरण हाताळत मुलीला अगोदर जेवण दिले. त्यानंतर विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली. मुलीने सर्व आपबिती सांगितल्यानंतर गावाकडील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्या ठिकाणी मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. सोमवारी सायंकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी नांदेड गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *