करदात्यांना दिलासा कर भरण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

आयकर विभागाने ITR भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ ही मुदत देण्यात आली होती. परंतु ऑनलाइन कर भरण्यासाठी सामान्य श्रेणीतील करदात्यांच्या मोठ्या वर्गाला त्यांचे आयटीआर दाखल करण्यात अडचणी येत आहेत, कारण नवीन आयकर फाइलिंग पोर्टलवर अजूनही त्रुटी आहेत. करदात्यांच्या लाटेने ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत.

या सगळ्या बाबी लक्षात घेऊन, आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करू शकतात. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *