औरंगाबादेत शिवसेना पक्षातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

औरंगाबाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली दिसते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी शिवतेज संवाद अभियान राबवले तर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी संवाद ही मोहीम राबवली होती.

संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना नेते हे मोठं पद आहे. मी नेता आहे, अंबादास दानवे जिल्हा प्रमुख आहेत. त्यामुळे ते माझ्या लेव्हलचे नाही ते खूप छोटे आहेत. त्यांची माझ्याशी तुलना होऊ शकत नाही. असं माजी खासदार बोलले.

शहरातील तीन आमदारांवर आगामी मनपा निवडणूकित जबाबदारी असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अब्दुल सत्तार आणि मी मोर्चेबांधणी करणार आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी भाजपमधून शिवसैनिक आले आहे त्यांनादेखील मोठी जबाबदारी दिली जाईल.

कॉन्टॅक्ट होतो तुम्ही अब्दुल सत्तार आता भगवे झाले आहेत, त्यांनी कार्यालायही भगवे केले. त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी जादू केली आहे. स्थानिकच्या जिल्ह्यापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *