औरंगाबादमध्ये ‘या’ तारखेपासून सुरु होणार पहिली ते चौथीचे वर्ग!

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व गोष्टी आता पूर्वपदावर येत आहे. यातच आता मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील पाचवी ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या असून आता पुढील आठवड्यात पहिली ते चौथीचे वर्गही भरतील, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सध्या नियंत्रणात असल्यामुळे महापालिकेने सर्व इयत्तांचे वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. 14 फेब्रुवारीपासून पहिली ते चौथीचे वर्ग भरवले जातील अशी माहिती प्रशासकांनी दिली आहे.

तसेच शहरातील पहिली ते बारावीपर्यंतच्या कोचिंग क्लासेसनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्व शाळा व्यवस्थापनाने कोरोनासंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मनपाच्या सूनचा न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

वर्ग सुरु करताना शाळांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहनचालक, रिक्षाचालक यांना कोरोना लसीकरण बंधनकारक आहे. कोरोना नियमांच्या पालनासह शाळेत गर्दी टाळण्यासाठी पालकांना प्रवेश देऊ नये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, वर्गात 15 ते 20 विद्यार्थीच उपस्थित असावे, आदी नियमावली जारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *