औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यावरून चार जनांनावर चाकूचे वार, पाणी प्रश्न झाला गंभीर
औरंगाबाद शहरातच नव्हे तर आता परिसरातील आणि ग्रामीण भागात सुद्धा पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर पिण्याच्या पाण्यावरून आता वाद होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. अशाच वादातून वाळूज परिसरात चौघांना चाकूने भोसकल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा : पुण्याचा ‘हा’ कुख्यात गुंड देखील सिद्दू मुसेवाला खुनात होता सहभागी
हाती आलेल्या माहिती नुसार, रांजणगाव शेणपुंजी येथील प्रभाकर चोरमले हे कुटुंबासह किरायाच्या घरात राहतात. बाजूलाच दुसऱ्या खोलीत भाऊसाहेव दळवी यांचे कुटुंब सुद्धा किरायाने राहतात. काही दिवसांपासून सामायिक नळाचे पाणी भरण्यावरून दळवी आणि चोरमले कुटुंबात वाद व्हायचे. दरम्यान शनिवारी सायंकाळी दोन्ही घरांतील महिलांचा पुन्हा पाण्यावरून वाद झाला. या वादानंतर रात्री दळवी कुटुंबातील तिघांनी चोरमलेंच्या घरी जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ केली.
हेही वाचा : थोडं जिवाणू विषयी,आपल्या पिकासाठी कोणते आणि किती योग्य
आईला शिवीगाळ केली जात असल्याने संकेत चोरमले हा समजावण्यासाठी घराबाहेर आला. यावेळी योगेश दळवी याने संकेतवर चाकूने वार केले. संकेतने मदतीसाठी आरडाओरडा केला असता त्याचे आई-वडील आले. योगेशने प्रभाकर चोरमले यांच्यावर सुद्धा चाकूने दोन तर, चोरमले यांच्या पत्नीवर एक वार केला.
घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलिसांनी गंभीर जखमी चार जणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर याप्रकरणी संकेत चोरमले यांनी भाऊसाहेब, योगेश, महेश व दळवीबाई यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तर भाऊसाहेब दळवी यांनीही प्रभाकर चोरमले, संकेत चोरमले व नितीन चोरमले यांनी आपल्याला व कुटुंबीयांना मारहाण केल्याची तक्रार दिली. यावरून दोन्ही कुटुंबांतील 7 जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.