मेट्रोमोनी साईटवर “स्थळ” बघताय तर हि बातमी नक्की वाचा

मेट्रोमोनी साईटवर स्थळ शोधत आहात तर सावधान यावर २५५ पेक्षा जास्त तरुणींना गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन भामट्याना अटक केली आहे. पुण्यात वाकड पोलीस ठाण्यात दोन मुलींनी तक्रार दिल्यांनतर हा प्रकार समोर आला आहे. मेट्रोमोनी साईटवरून एक-दोन नव्हे तर तब्बल २५५ पेक्षा जास्त तरूणींना गंडा घालण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या या दोन भामट्यांनी अनेक तरूणींना जाळ्यात ओढत त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींपेक्षा जास्त रक्कम लुटल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तरुण पुण्यातील एका हॉटेलमध्ये खोट्या नावाने राहत होते. तेथूनच देशभरातील अनेक तरूणींसोबत संपर्क साधत असत. केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याचे सांगून काही दिवसांनी मुलींकडे पैशांची मागणी करायचे.

या दोन्ही संशयीत तरुणांकडून पोलिसांनी ७५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे यात खोटे आधारकार्ड, खोटे केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याचे ओळखपत्र, महागडे मोबाईल, महागड्या गाड्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांना तपासणी दरम्यान संशयीतांनी पुण्यातील ९१, बंगळुरू येथील १४२ आणि गुरंगाव येथील २२ अशा जवळपास २५५ मुलींची फसवणूक केली असून त्यांच्याकडून एकूण दीड कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

मागील काही वर्षात अश्या मॅट्रिमोनियल साईट्सवर स्थळ शोधण्याचं प्रमाण वाढलं आहे, त्यासोबतच अश्या फसवणूक करणाऱ्या साईटच प्रमाण देखील वाढलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *