आता पत्नीकडून मिळणार पतीला पोटगी, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

औरंगाबाद : आपण घटस्पोटाच्या प्रकरणात नेहमी ऐकतो कि, पतीने पत्नीला पोटगी आणि उदरनिर्वाह भत्ता दिला, मात्र नांदेड शहरात या विपरीत घडलं आहे. नांदेड शहरातील एका दाम्पत्याने घटस्फोटासाठी नांदेड दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालनेने निकाल पतीच्या बाजूने देत, पत्नी कडून पतीला पोडगी देण्यात यावी असा निर्णय दिला. या विषयावर पत्नीने औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने देखील हा निर्णय कायम ठेवला.

हाती आलेल्या माहिती नुसार, नांदेडमधील एका दाम्पत्याचे लग्न १९९२ मध्ये झाले होते. मात्र काही कारणांमुळे पत्नीने घटस्फोट मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालय नांदेड येथे अर्ज केला. या खटल्यातील सर्व सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने २०१५ मध्ये या दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर केला. मात्र पतीकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. तर पत्नी सरकारी नोकरी करत असून तिला उत्तम पगार आहे. ती ज्या पदावर पोहोचली आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी पतीचेही योगदान मोठे आहे. त्यामुळे आता मला उदर निर्वाहासाठी पत्नीने काही पोटगीची रक्कम द्यावी, अशी मागणी पतीने कोर्टाकडे केली होती. हा विनंती अर्ज विचारात घेऊन, दिवाणी न्यायालयाने हिंदू विवाह अधिनयम १९५५ च्या कलम २४ व २५ अन्वये घटस्फोटानंतर पत्नीने पतीला स्थायी पोटगी आणि निर्वाह खर्च म्हणून काही रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र पत्नीने त्या आदेशाविरोधात खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती.

हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम २५  अंतर्गत घटस्फोटानंतरही पती किंवा पत्नी सदर कलमानुसार स्थायी पोटगी व निर्वाह खर्च मिळावा म्हणून अर्ज दाखल करू शकतात. कारण कलम २५  मध्ये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, कोणताही हुकूमनामा करण्याच्या वेळी किंवा त्यानंतर पती किंवा पत्नी सदर कलमानुसार पोटगीसाठी अर्ज दाखल करू शकतात. तो गृहित धरून खंडपीठाने दिवाणी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *