राज्यात आरोग्य भरती पुन्हा होणार ; मंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्य सरकारने आरोग्य भरती परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार आहेत. आज पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले.

आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे.

हेही वाचा :- राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा अयोध्येत येऊ देणार नाही – भाजप खासदारासह हिंदू संत-महंतांचा निर्णय

तसेच राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत माहिती दिली आहे. कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही. जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्याता आला आहे

किडनी रॅकेटचा निकाल लवकरच लागणार ? पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आमच्याकडे त्यांची सुनावणी सुरू आहे. आणखी आठ दिवस लागतील सगळ्या बाजूची माहिती घेऊन योग्य तो निकाल दिला जाईल

हेही वाचा :- PM किसान खत योजना:शेतकऱ्यांना खतासाठी 11,000 रुपये मिळणार का ? मिळणार तर कसे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *