सोशल मीडियावर मैत्री पडली महागात ; तरुणाने केला तरुणीवर अत्याचार

 

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पालम (जि. परभणी) तालुक्यातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना १ मे रोजी समोर आली. याप्रकरणी सुरुवातीला सीटी कोतवाली अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मात्र घटनास्थळ हिंगोली असल्याने हे प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

हेही वाचा :- तब्बल ५० लाखाची लाच घेताना ; जलसंधारण अधिकाऱ्याला अटक

पालम (जि. हिंगोली ) तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय विद्यार्थिनीची ओळख इंस्टाग्रामवरुन हिंगोली शहरातील अशफाक पठाण अहमद खान याच्याशी झाली. ही ओळख वाढत गेली आणि दोघांची मैत्री झाली. अशफाक पठाण याने त्याच्या एमएच ३८ व्ही ९२७४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून मुलीला हिंगोली येथे आणले.

हेही वाचा :- पैसे न दिल्याच्या कारणाने, मुलाने केला पित्याचा खून

त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून १९ फेब्रुवारी २०२१ ते १ मे २०२२ या काळात हिंगोली ते वाशिम रोडलगत असलेल्या एका ठिकाणी चारचाकी वाहन नेऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून अशफाक पठाण अहमद खान याच्याविरुद्ध सीटी कोतवाली अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मात्र घटनास्थळ हिंगोली असल्याने हे प्रकरण हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक आर. एन. मळघणे तपास करीत आहेत.

ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *