गोव्यात माजी मुख्यमंत्रीचं तिकीट कापल्याने भाजपला रामराम

[lock][/lock]गोवा विधानसभेची निवडणूकीची (Goa Assembly Election) तारीख जाहीर होताच आता उमेदवारांच्या यादींची घोषणा होऊ लागली आहे. पण गोवा भाजपमध्ये (BJP Goa) उत्पल पर्रिकर यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. उत्पल पर्रिकर (utpal parlikar)यांनी काल पणजीमधून तिकीट न मिळाल्यामुळे भाजपला सोठचिठ्ठी दिली, तर पहिल्या यादीमध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर यांचेही नाव नसल्यामुळे त्यांनी भाजपा सोडत अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र आहेत.
यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे पार्सेकर नाराज असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मला पक्षाकडून पुर्नवसन नको, माझा जनतेवर पुर्ण विश्वास असल्यामुळे मी भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष लढण्याचा निर्णय घेत आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रे विधानसभा मतदार संघातून इच्छुक असल्याची गोव्यात चर्चा आहे.

https://twitter.com/ANI/status/1484799731402698757?t=giv4StR-0r92vAI7aNdYTw&s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *