क्राईम बिट

“या” कारणाने नवरदेवासोबत विवाह करण्यास नवरीने भर मंडपात दिला नकार..!

Share Now

मद्यपी नवरदेवासोबत विवाह करण्यास नवरीने भर मंडपात नकार दिल्यामुळे लग्नचं रद्द झालं. या प्रकारात दोन वेळा पोलिसांना बोलवावे लागले.

हरियाणाच्या महेंद्रगढमध्ये शुक्रवारी मध्यरात्री १२ नंतर पंचमुखी हनुमान मंदिराजवळ काही वऱ्हाडी डीजे लावून नाचत होते. त्यावेळी मुलाकडचे सर्व वहऱ्हाडी दारूच्या नशेत होते, व महिलांची छेड काढत होते, असा आरोप केला जात आहे. अखेर रात्री १ वाजता पोलिसांना घटनास्थळी यावं लागलं. पोलिसांनी वधू आणि वराकडील मंडळींची समजूत काढली.

राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई ; ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासही मनाई

परंतु रात्री ३ वाजता पुन्हा वऱ्हाडींनी डीजेवर नाचायला सुरू केली, त्यानंतर प्रकरण आणखीच गंभीर झाले. कारण त्यावेळी नवरदेवानेही दारू प्याली होती. यावेळी बाचाबाची झाली व पोलिसांना पुन्हा बोलावण्यात आले.

अखेर दारू प्यालेल्या नवरदेवाशी नवरीने विवाह करण्यास साफ नकार दिला. विवाहाच्या दिवशीच नवरदेव दारू पिऊन धिंगाणा करीत असेल तर, पुढे तो काय करील, असा विचार मुलीकडच्यांनी केला. स्थिती आणखी बिघडण्याआधीच विवाह न झालेला बरा, असेही अनेकांचे मत होते. अखेर विवाह न होताच मुलाकडचे वऱ्हाडी आले, आणि वधुविनाच गेले.

मुलीला वाचण्यासाठी आईने घेतली पाण्यात उडी मात्र दुर्दैवाने माय लेकीसह पाच जण पाण्यात बुडाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *