पश्चिम बंगाल विधानसभेत राडा, पाच भाजप आमदार निलंबित

 पश्चिम बंगाल : विधानसभेत जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजप आणि तृणमूल कोंग्रेसच्या आमदारांमध्ये फ्रीस्टाईल मारामारी झाली. या प्रकरणानंतर  भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा केला आहे.

विधानसभेतील व्हिडीओ मध्ये आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तसंच शर्ट फाडत असल्याचंही दिसत आहे. “त्यांना मला ढकललं, शर्ट फाडला,” असं भाजप आमदारांनी सांगितले असून, या प्रकारा नंतर  भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. आम्ही बिरभूममधील घटनेवर चर्चेची मागणी करत असताना सत्ताधारी आमदारांनी आम्हाला मारहाण केल्याचं सांगत ते सभागृहातून बाहेर पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *