औरंगाबादेत चोरट्याची फिल्मी स्टाईल चोरी, पोलीस ठाण्यातून निरीक्षकाची पळवली गाडी आणि मग…

औरंगाबाद : शहरातून एका फिल्मी स्टाईल चोरीचा प्रकार समोर आला आहे. आधी खुलताबाद पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षकाची सरकारी गाडी चोरी करून त्या चोरट्याने धूम ठोकली. हा प्रकार सोमवारी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमाराज घडला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फुलंब्री ते खुलताबाद रस्त्यावर नाके बंदी केली. या वेळी चोराने विरामगाव येथील एका शेतात जीप सोडून तेथून पळ काढला.

दरम्यान, मध्यरात्री गदाना येथून एक दुचाकी चोरून भडजी येथे आला तिथे त्याने टाटा मॅजिक ( छोटा हत्ती ) चोरी करून पसार झाला. या सर्व प्रकार मुळे पोलिसांच्या अब्रूचे चांगलेच धिंडवडे उडाले आहे. अद्याप तो चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव याच्या नेतृत्वखाली त्या चोराचा शोध सुरु आहे. गुन्हे शाखा तसेच खुलताबाद पोलीस या चोराचा तपस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *