३१ जानेवारीपर्यंत प्रचार रॅली आणि सभा घेण्यास बंदी निवडणूक आयोगाचा निर्णय
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणूकीतील प्रचारांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर असलेली बंदी कायम ठेवली आहे. मागील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने रॅली आणि सार्वजनिक सभांवरील बंदी २२ जानेवारीपर्यंत वाढवली होती. कोरोनाचा रुग्ण संख्या वाढत असल्याने निवडणूक आयोगाने ही बंदी ३१ जानेवारीपर्यंत कायम केली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले असून . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक आहे . सुरुवातीला आयोगानं १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली. त्यानंतर २२ जानेवारी तसेच आता ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे देखील म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे.