खा. नवनीत राणा यांची प्रकृती खालावली, तुरुंगातून जेजे रुग्णालयात दाखल
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिलासा मिळाला नाही . राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही.
राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवार ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. आज राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा :- राज ठाकरेनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट ; करत केली मुख्यमंत्र्यांवर टीका
शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्या नंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. तसेच आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहे . त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला आहे.
खासदार नवनीत रवी राणा यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांची प्रकृती बरी नसल्याची तक्रार यापूर्वी त्यांच्या वकिलांनी दिले होते.
हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे