क्राईम बिट

खुनाची मालिका तुटेना ! “साहेब, रोजची कटकट थांबवली” म्हणत पत्नीच्या खुनाची पतीने स्वतःच दिली कबुली

Share Now

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील खुनाचे सत्र लागोपाठ सुरूच आहे. आपतगाव भागात पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला व “साहेब, रोजची कटकट संपवली.” असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली.

पत्नीचं कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसोबत जमत नसल्याने पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. सुनीता कडूबा हजारे (वय 36 वर्षे, रा. आपतगाव, ता. औरंगाबाद) असे मृत महिलेचे, तर कडूबा भागाजी हजारे (वय 42 वर्षे) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २ वाजता कडूबा हजारे हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात आला. त्याने साहेब, मी पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. रोजची कटकट एकदाची संपविली, अशी माहिती दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नेमकं काय घडलं हे पोलिसांना देखील कळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, कडूबा हजारे याने आपल्या पत्नीची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले.

रेल्वे नोकरी: पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 10वी पाससाठी 2500 जागा, येथे अर्ज करा

मृताच्या मुलाने आईला सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासल्यानंतर घाटीत घेऊन जाण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार घाटीत डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. मात्र सुनिता यांच्या हत्याप्रकरणी अजून नातेवाईकांकडून कोणतेही तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर देखील तक्रार आली नाही तर पोलिसांतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पीएम किसान: 31 डिसेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी पडताळणी करणे बंधनकारक, नाहीतर खात्यात हप्ता येणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *