कोरोना अपडेट

लॉजमध्ये डॉक्टर महिलेची आत्महत्या

Share Now

नांदेड शहरातील एका लॉजमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डॉक्टर मागील दोन दिवसांपासून याच लॉजमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी बराच वेळ महिला डॉक्टरने आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नाही, यामुळे लॉजच्या मॅनेजरला संशय आला. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेची माहिती वजीराबाद पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

विद्या अमोल सुकवाड आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी असून मृत विद्या २२ मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरात पंजाब लॉजवर राहत होत्या. २३ मार्च रोजी विद्या सकाळी बाहेर जाऊन पुन्हा लॉजवर परतल्या परंतु २४ मार्च रोजी सकाळी बराच वेळ त्या रूममधून बाहेर आल्या नाहीत.

लॉजच्या मॅनेजरला शंका आल्याने डॉक्टर विद्या यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु रूममधून प्रतिसाद मिळत नव्हता. काही वेळाने मॅनेजरने पुन्हा दार वाजवून विद्या याना उठवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मॅनेजरने याबाबत माहिती वाजीराबाद पोलिसांना दिली. पोलिसांनी रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, डॉक्टर विद्या मृतावस्थेत आढळून आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *