Digital Payment : मोबाइलवरील व्यवहारांवर येणार मर्यादा?

अंमलबजावणीबाबत लवकरच निर्णय

देशाच्या अर्थव्यवस्थेत यूपीआय यंत्रणेमुळे मोठी क्रांती घडली.कोणत्याही शुल्काविना क्षणात पैसे हातातील मोबाइलद्वारे ट्रान्स्फर शक्य झाले . दररोज कोट्यावधी व्यवहार यूपीआय मार्फत होतात मात्र या यंत्रणेवर गुगल पे आणि फोन पे यांची मक्तेदारी आहे. ती लवकर मोडीत निघण्याची शक्यता आहे .

७३० कोटी ऑक्टोबरमध्ये व्यवहार झाले,
तसेच १२.११ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली

भारतीय राष्ट्रीय भूगतांन निगम अर्थात NCPI थर्ड पार्टी UPI पेमेंटसाठी एकूण उलढालीवर 30 टक्क्यांची मर्यादा टाकण्याचा प्रस्तवा आहे 31 डिसेंबर पासून याची अंमलबजावणी करण्याची तयारी देखील आहे. याबाबत आरबीआयसोबत चर्चा सुरू आहे.

गुगल पे, फोन पेची ८० टक्के हिस्सेदारी

थर्ड पार्टी युपीआय व्यवहारांवर सध्या कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे युपीआय व्यवहारांमध्ये गुगल पे आणि फोन पे यांची हिस्सेदारी ८०% वर पोहोचली आहे. त्यामुळे बाजारात त्यांची मक्तेदारी वाढली आहे. त्यामुळे एनसीपीआने त्यावर ३० टक्के मर्यादा टाकण्याचा प्रस्ताव दिला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *