निकाल कमी आला ? खचुनका पहा नागराज मंजुळेंचा १० वीचा निकाल

बारावी, आयुष्याला कलाटणी देणार शैक्षणिक वर्ष, बारावी नंतर सर्वच डॉक्टर, इंजिनिअर होतात असे नाही आणि बारावीत फक्त आणि फक्त यश मिळवलेले विध्यार्थीच आयुष्याच्या परीक्षेत अव्वल येतील असे हि नाही, अपयश हि यशाची पहिली पाहिरि आणि हीच पाहिरि चढून कोणी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर होतो, कोणी चौथीत नापास होऊन भारतातला मोठा उद्योजक धीरुभाई अंबानी होतो, तर कुणी दहावीत दोनदा नापास होऊन नागराज मंजुळे होतो. दहावी बारावीत नापास झाल्यानंतरही आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या काही उदाहरणांवरुन आपण ही गोष्ट लक्षात घेऊ शकतं. कि निकाल नाही, कर्तृत्व आपली ओळख आणि यश ठरवत.

हेही वाचा : 

मराठमोळे दिग्दर्शक, लेखक, कवी नागराज मंजुळे यांचं नाव देखील या यादीत मुख्यत: येतं. मंजुळे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केलं होतं. मंजुळे पोस्टमध्ये लिहितात, “मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी.… परीक्षा कुठलीही असो. ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही,” या सोबातच त्यांनी आपला रिझल्ट हि पोस्ट केली अक्षरशः इंग्रजीत सहा मार्क पडलेला हा माणूस बोली भाष आणि विचारांच्या जोरावर प्रत्येक मराठी मनावर अधिराज्य गाजवतोय.

निकाला नंतर अनेक विध्यार्थी खचून जातात, निकाल फक्त कागदावर असतो तो कितपत खार ठरवल ते फक्त आणि फक्त तुच्या हातात असते. तुम्ही सर्वात वेगळे आणि अनोखे आहेत, ते आकडे तुमच्या पासून तुमची ओळख हेरावून गेऊ शकत नाही. मार्क कमी पडले, म्हणजे तुमच्यात काही कमी आहे असे नाही. स्वतःला ओळख आणि या आयुष्याचा आनंद घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *