ठाणे आणि मुंबईत जमाव बंदी, कलम १४४ लागू

सद्य सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या संताप मुळे ठाणे आणि मुंबईत जमाव बंदी लागू करण्यात अली आहे. काही बंडखोर आमदाराच्या कार्यालयावर शिवसेनेनीकांनी तोडफोड केली, त्यामुळे पोलीस प्रशासनाने मुंबई तसेच ठाणे येथे जमाव बंदी लागू केली आहे, अनेक बंडखोर आमदारांच्या फोटोला काळ देखील फासण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्या बेनर वर देखील काळ फासण्यात आले आहे.

तसेच या सर्व गोधळामुळे भाजप कडून टीका देखील होत आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमित शहांना बंडखोर आमदारांच्या कुटुंबाना केंद्रीय सुरक्षा द्या अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर गुंड पाठवत आहे असे आरोप नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर लावला आहे.

‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ हे असेल शिंदे गटाचं नाव, शिवसेना दोन गटात विभागली?

दरम्यान, सध्या महाराष्ट्राचं राजकरणात मोठ्या घटना घातडत आहे. दरम्यान शिवसेनेचे ३७ आमदार गुवाहाटीत शिंदेंना पाठिंबा देत आहे. हा गट संविधानिक रित्या बाहेर येण्यासाठी आणि कादेशीर बाबीं साठी या गटाचं नाव ठेवलं आहे ‘ शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ गट असे या गटाचे नाव असले. आता पुढे काही कायदेशीर बाबी या नावावर आणि गटावर होतील. दरम्यान धनुष्यबाण या निवडूंक चिन्हाचा देखील आता काय होत? असे प्रश्न आता समोर येत आहे.

खरीपात पेरणी केलेले शेतकरी संकटात, पावसाची प्रतीक्षा, दुबार पेरणीची भीती

कलम १४४ काय आहे?

CRPC चे कलम 144 शांतता राखण्यासाठी किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी लागू करण्यात येते. कोणतीही सुरक्षा, आरोग्य धोक्यात किंवा दंगलीचा धोका असल्यास कलम 144 लागू होते, त्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत नाहीत. कलम लागू करण्यासाठी क्षेत्राच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी अधिसूचना जारी केली जाते . कलम 144 लागू झाल्यानंतर इंटरनेट सेवा देखील सार्वजनिक प्रवेशापासून निलंबित केली जाऊ शकते. हे कलम लागू झाल्यानंतर त्या भागात शस्त्रे नेण्यासही बंदी घालण्यात येते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *