नवीन प्रभाग रचना तयार करा ; नगरविकास खात्याकडून मनपाला आदेश
राज्यात मुदत संपलेल्या महापालिकांना प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश नगररचना विभागाने दिले, असून ही प्रभाग रचना कधीपर्यंत सादर करावी याचा कोणताही उल्लेख या आदेशात केला नाही. याआदेशामुळे नव्याने प्रभागरचना होणार ही बाब स्पष्ट झाली आहे.
चार महिन्यांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने बहु सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. मात्र आता राज्य सरकारने नवीन कायदा करून प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहे. नगरविकास खात्याने पुन्हा प्रक्रिया नव्याने सुरू केली असून राज्यात बावीस महापालिकांच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :- वकील गुणरत्न सदावर्तेच्या पोलीस कोठडीत पुन्हा ४ दिवसांची वाढ
औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल २०२ मध्ये होणार होती. कोरोनाच्या महामारीमुळे निवडणूक लांबली महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. वॉर्ड रचनेत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाली. निवडणूक आयोगाने महापालिका शासनाला पत्र पाठवून त्रिसदस्यीय पद्धतीने आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश केले होते. त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनाने आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता.
हेही वाचा :- किरीट सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांवर मोठा आरोप, ‘तो’ हवालाकिंग कुठे आहे ? केला असा सवाल
प्रभागरचना सदस्यसंख्या निश्चित करण्याचे अधिकार यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडे होते मात्र नव्या नियमानुसार द्वारकादास राज्यशासनाकडे आहे यामुळे नगरविकास खात्याच्या अंतर्गत पुढील प्रक्रिया होईल.
हे ही वाचा (Read This) शैक्षणिक सत्र 2022-23 पासून नैसर्गिक शेती हा अभ्यासक्रमाचा भाग असेल, कृषी विद्यापीठांमध्ये तयारी सुरु !