विमानात मोठे तांत्रिक बिघाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा रद्द.

५ ते ८ जानेवारीदरम्यान औरंगाबाद येथील शेंद्रा ऑरिक सिटी येथे होणाऱ्या मराठवाडा स्मॉल स्केल इंदूस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल असोसिएशनच्या (मसिआ) महाॲडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्तिथ राहणार होते परंतु वेळेवर विमानात तांत्रिक बिघड झाल्याने औरंगाबाद दौरा रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळावर तासभर थांबले,तरीही विमानात दुरुस्ती न झाल्याने दौरा रद्द करण्यात आला.

‘मला पोलिस दूर दूर दिसत नव्हते…’, कांजवाला घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली..

ऑरिक सिटी येथे होणाऱ्या महाॲडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोचं उद्दघाटण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटण होणार आहे.
३० एकरांवर होत असलेल्या या एक्सपोच्या प्रदर्शनात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्राच्यामाध्यमातून मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता जगासमोर दाखवली जाईल. या आधी DMIC ला भेट देऊन गुंतवणूक न केलेल्या १३५ कंपन्यांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं आहे.

CTET 2023 परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाहीर, आता या दिवशी परीक्षा होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *