चित्रपटगृहांवरील निर्बंध हटवा; व्यावसायिक आणि निर्मात्यांची मागणी!

औरंगाबाद : शहरात कोरोनाचाउ प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक गोष्टींना निर्बंधातुन सूट देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहांना यातून कुठलीही सूट देण्यात आली नसल्याने चित्रपटगृहे तोट्यात सुरु असल्याची तक्रार व्यावसायिक आणि निर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने चित्रपटगृहांचे निर्बंध हटवून शो पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

सध्या राज्यात सर्व गोष्टींवरील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपटगृहांचे निर्बंध कायम आहेत. त्याचा मनोरंजन व्यवसायाला फटका बसला आहे. सध्या चित्रपटगृहांचे रात्रीचे शो रद्द करण्यात आले आहेत. शिवाय, एक खुर्ची सोडून म्हणजेच प्रेक्षागृहाच्या निम्म्या क्षमतेत चित्रपटगृहे सुरू आहेत. त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. करोना संसर्गामुळे दोन वर्षांपासून हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. या चित्रपटांची प्रदर्शनासाठी रांग लागली आहे. एका आठवड्यात तीन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण, शेवटचा शो नसणे आणि मल्टिप्लेक्समध्ये शो मिळत नसल्याने व्यवसाय घटला आहे. चित्रपट निर्मात्यांचे उत्पन्न बुडत असून राज्य शासनाने चित्रपटगृहांचे निर्बंध शिथील करावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. दिवसाच्या शोपेक्षा रात्रीच्या शोचे उत्पन्न जास्त असते. चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनालाही व्यवसाय कमी झाल्यामुळे आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *