क्राईम बिटमहाराष्ट्र

बालपणीच्या मित्राने केला मैत्रिणीवर अत्याचार

Share Now

औरंगाबाद : शहरातील औधोगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे वाळूज भागातील तीसगाव शिवारात. एका मित्रानेच मैत्रिणीवर लग्नाचे अमिष दाखवत वारंवार लैगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पीडित मुलगी २१ वर्षाची बी.कॉमची विद्यार्थिनी आहे आणि आरोपी हा २६ वर्षीय विवाहित आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, दिनेश शेलार (२६, रा तिसगाव) आणि पीडित मुलगी बालपणीचे मित्र मैत्रीण आहे आणि ते एकाच गावात राहत. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तसेच दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. याचाच फायदा घेऊन दिनेशने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार पीडितेवर अत्याचार केला. गेल्या वर्षी ५ मार्च २०२१ रोजी दिनेशचा विवाह त्याच्या नात्यातील मुलीसोबत झाला. त्यावेळी पीडितेने त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकले.

दरम्यान, लग्न होऊन सुद्धा दिनेश पीडितेला फोन करत असे, मला तुला भेटायचे आहे. असे वारंवार म्हणत. ६ जानेवारी २०२२ रोजी दिनेश आणि पीडित मुलगी भेटले. वयक्तिक बोलायचे आहे म्ह्णूत त्याने तिला लॉजवर नेले आणि तेथे तिच्या इच्छेविरुद्ध लैकिग संबंध प्रस्तापित केली. त्या नंतर त्याने तिला बदनामीची धमकी दिली. मग वारंवार अनेक वेळा तिच्या इच्छेविरुद्ध लैकिग संबंध प्रस्तापित केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने कुणाला काहीच सांगितले नाही. शेवटी त्रासाला कंटाळून तिने सगळी घटना तिच्या आईला सांगितली तिच्या आई सोबत जाऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. काल दिनेश शेलार याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *