भावानेच केला भावाचा खून, पैठण येथील घटना

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या खुनाचे सत्र सुरूच आहे. पैठण येथील बालानगर येथे भानच भावाचा डोक्यात कुऱ्हाडीने वर करून खून केल्याची घटना घडली आहे. संतोष भानुदास गल्हाटे (२७) असे मृताचे नाव आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे खून करून आरोपी स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली.

हाती आलेल्या माहिती नुसार, दिनेश गल्हाटे असे आरोपीचे नाव असून तो मृत संतोषच्या भावकीतील होता.१२ जानेवारीच्या रात्री दिनेश आणि मृत संतोष बलानगर येथील दारूच्या दुकानासमोरील मैदानात बसलेले होते. तेथे त्यांच्या जुन्या भांडणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारी दरम्यान दिनेशने संतोषच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यात संतोष जमिनीवर कोसळला.

दरम्यान, दिनेश पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः केलेल्या खुनाची कबुली देत म्हणलं, “मी संतोषला कायमचा खल्लास केला” हे ऐकताच पोलीस ठाण्यात एकाच खळबळ उडाली. सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल, पोलीस उपनिरीक्षक दीपक चौरे, राहुल भादरगे यांचा सहा घटनास्थळी धाव घेतली. तसेच संतोषचा मृतदेह शासकीय रुगणालयीत दाखल करून घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपस एमआयडीसी पैठण पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *