भाजप महिला नेत्या चित्रा वाघ, आ सुरेश धस यांनी दिली बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची तक्रार देण्याची सुपारी

भाजप महिला नेत्या चित्रा वाघ, आ सुरेश धस यांनी दिली बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची तक्रार देण्याची सुपारी दिली.बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात राकाँचे महेबूब शेख यांना गोवले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी भाजपचे आ. सुरेश धस, महिला नेत्या चित्रा वाघ यांनी नदिमोद्दीन अलीयुद्दीन शेख (रा. टाईम्स कॉलनी, औरंगाबाद) याला सुपारी दिली होती. त्यानेच ब्लॅकमेल करून महेबूब शेख यांना खोट्या गुन्ह्यात अडकविले असल्याचा दावा पीडितेने नदिमोद्दीन याच्या विरोधातील बलात्काराच्या फिर्यादित केला आहे.

नदिमोद्दीन अलीयुद्दीन शेख, त्याचा चालक विशाल खिलारे (रा. मुकुंदवाडी) यांच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा शनिवारी नोंदविण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार नदिमोद्दीन शेख याच्यासोबत विवाहाचा प्रस्ताव नातेवाइकांनी आणला होता. १७ डिसेंबर २०२० रोजी प्राथमिक चर्चा करण्यासाठी नदीमला पीडितेच्या घरी बोलावले होते.

पहिल्या भेटीत पीडिता व तिच्या आईला नदीम आवडला. त्यानेही लग्नानंतर खुश ठेवण्याचा शब्द दिला. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी नदीमने पीडितेला टाईम्स कॉलनीतील स्वत:च्या फ्लॅटवर नेले. नदीमचा चालक विशाल खिलारे हा शीतपेय घेऊन आला. ते प्यायल्यानंतर पीडितेला गुंगी आली. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्यावर अत्याचार झाला होता. नदीमने अत्याचाराचा व्हिडिओसुद्धा बनविल्याचे सांगितले. तो व्हायरल

करण्याची धमकी देत त्याने एका व्यक्तीविरोधात बलात्काराची खोटी केस दाखल करावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी मोठी रक्कम घेतल्याचे नदीम म्हणाला. त्याच दिवशी रात्री नदीम पीडितेला घेऊन नाशिकला आला. २० डिसेंबर रोजी एका पोलीस ठाण्यात महेबूब शेख यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास सांगितले.

नाशिकहून परत आल्यानंतर २६ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नदीम घेऊन गेला. तोपर्यंत महेबूब शेख यांची ओळखही नव्हती. ३१ डिसेंबरला नदीमने ज्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, तो राष्ट्रवादीचा मोठा नेता असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यापासून जिवाला धोका असल्याचे सांगून दौलताबादला पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. नेल्याचेही तपास उपनिरीक्षक पूनम पाटील करीत आहेत.

आष्टीमध्ये धस, वाघ पीडितेला भेटले

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे पीडितेला नदीम हा १ जानेवारी २०२१ रोजी घेऊन गेला. त्या ठिकाणच्या कृष्णा हॉटेलमध्ये भाजपचे आ. सुरेश धस पीडितेला भेटले. ते एका पत्रकाराला घेऊन आले होते. आ. धस यांनी लिहून दिल्याप्रमाणे वाहिनीला ‘बाईट’ दिली.

• आ. धस यांच्यासोबत जिया बेग नावाचे व्यक्तीही उपस्थित होते. ‘बाईट दिल्यानंतर धस यांच्यासोबत एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो. त्या ठिकाणी एका समाजसेविका महिलेची ओळख करून दिली. त्यांचे नाव चित्रा वाघ होते. वाघ यांना पीडितेने आपल्याला खोटी तक्रार करण्यास लावली असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी ‘तुला आता एफआयआरप्रमाणेच बोलावे लागेल, नाही तर खोटी केस केली म्हणून आयुष्यभर जेलमध्ये सडावे लागेल, असे सांगितले. फिर्यादीत म्हटले आहे.

बॅग भरून पैसे दिले
चित्रा वाघ यांनी मीडियाशी कसे बोलायचे, हे शिकवले. त्यानंतर नदीम, वाघ, धस आणि जिया बेग यांच्यात चर्चा झाली. मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर आष्टीच्या रस्त्यावर जिया बेग यांनी एक बॅग आणून दिली. त्या बॅगमध्ये काय आहे, असे नदीमला विचारल्यानंतर त्याने खर्चासाठी पैसे दिल्याचे सांगितले, ते बॅग भरून पैसे होते. मुंबईला गेल्यानंतर टीव्हीवर महेबूब शेख रडताना दिसले. तेव्हा नदीमने हेच ते असल्याचे सांगितल्याचेही फिर्यादीत म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *