अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, भाजपचे उमेदवार मुरजी पटले यांनी अर्ज घेतला मागे
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीची चर्चा सुरू असताना आज मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता भाजपचे उमेदवार मुरजी पटले यांनी अर्ज मागे घेतला आहे.
सासरच्या मंडळीं विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून शिवीगाळ
रविवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधेरीतील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.
या रब्बीत करा काळ्या गव्हाची लागवड, बाजारात 6000 रुपये क्विंटलने विकला जातो,जाणून घ्या संबंधित मुख्य गोष्टी
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून देखील नाट्य घडले होते. मुंबई महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या लटके यांना राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती.
भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेतली तरी अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटात मुख्य लढत आहे. या दोन मुख्य प्रतिस्पर्ध्यांशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक आहे.