भाजप शिंदे सरकारने नामांतराला दाखवला हिरवा कंदील, नामांतर होणारच !

सत्तेतून जाताना ठाकरे सरकारने एकामागून एक नामांतराचे निर्णय घेतले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारने घेतलेल्या शेवटच्या मंत्रिमंडळातील निर्णयांना स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्री शिंदे या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेतला आणि आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बठकीला पुन्हा नामांतराच्या मुद्द्यांना मंजुरी दिली आहे.

नेपियर गवत वाढवत आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न, शेतकरी दरमहा कमवत आहेत एक लाख रुपये जाणून घ्या सर्व काही

दरम्यान, औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि मुंबई विमानतळेचे नाव दि बा पाटील असे केले आहे. ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. यामध्ये औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलीवूड गायक दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणात अटक, 2 वर्षांची शिक्षा

याशिवाय, हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, अहमदनगर येथे दिवाणी न्यायालय, अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता, विदर्भ विकास मंडळ, वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना हक्काची घरे देणे, यासह अनेक निर्णय ठाकरे सरकारने एकाच दिवशी घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *