मोठी बातमी | शिंदे – फडणवीस सरकार देणार १ लाख तरुणांना रोजगार

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे-फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे.

१ लाखांहून अधिक रोजगारासाठी सरकारकडून सामंज्यस करार करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे.

राज्यातले उद्योग इतर राज्यात जात असल्याचा आरोप शिंदे फडणवीस सरकारवर होत असताना आता शिंदे -फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखाहून अधिक रोजगारासाठी आज सामंजस्य करार करण्यार येणार आहे. यासाठी राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. राज्यपाल भगतसिंग कोशयारी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.
…………………………………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *