मोठी बातमी ; मुंबईत १ कोटी ८५ लाखाचे अमली पदार्थ जप्त
आज मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने उरण फाटा येथील रेयान इंटरनॅशनल स्कूल समोरील रस्त्यावर तब्बल १ कोटी ८५ लाख २७ हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा म्हणजेच ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. दोन व्यक्ती अवैधरित्या अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं आहे.
आरोपी समसदिन शेख आणि राजेंद्र ऊर्फ बारकू पवार यांच्याकडून मेथाक्यलॉन नावाच्या एकूण १ किलो ५५० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. या ड्रग्सच्या मार्केट रेटनुसार अंमली पदार्थांची किंमत १ कोटी ८५ लाख २७ हजार आहे.
नवी मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने उरण फाटा येथील रेयान इंटरनॅशनल स्कूल समोरील रस्त्यावर ही कारवाई केली. समसदिन शेख आणि राजेंद्र ऊर्फ बारकू पवार हे अवैधरित्या अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं. या वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा मुद्देमाल कुठून आणण्यात आला यामागे अजून कोण आहे, याचा तपास सुरू आहे.