भूजल पातळीमध्ये अनपेक्षित वाढ…

विभागीय भुजल सर्वेक्षण विभागाने भुजल पातळीमध्ये २.७९ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद केली आहे. यंदा मराठवाड्यात १५२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे भुजल पातळीमध्ये वाढ झाली आहे. आता मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मराठवाड्यात पाऊस पडण्यासाठी दमट वातावरण सलग दुसऱ्या वर्षीही राहिले आहे. १ जून पासून ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ७२७.८ मिमीच्या तुलनेमध्ये १११२.४ मिमी म्हणजेच १५२.८ टक्के पाऊस पडला असल्याचा विक्रम करण्यात आला होता. यावर्षी २२ टक्के जास्त पाऊस पडला होता. मराठवाड्यातील ८७५ लहान मोठ्या धरणांमध्ये ९६ टक्क्यांवर जलसंचय झाला आहे. यंदा ६६५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे पावसाची सरासरी ५२ टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर या अतिवृष्टीमुळे माती आणि पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी कमी मुरून सरासरीच्या तुलनेत २.०५ टक्क्यांची भुजल तूट कायम राहिली आहे.

भुजलपातळी मोजण्यासाठी विभागीय भुजल सर्वेक्षण विभागाने औरंगाबाद येथील १४१, जालना येथील ११०, परभणी ८६, हिंगोली ५५, नांदेड १३४, लातूर १०९, उस्मानाबाद ११४, बीड १२६ अशा ८७५ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाऊसाळा लागण्यापूर्वीची भुजलपातळी आणि पावसाळा संपल्यापूर्वीच्या भुजल स्थिती याचा आणि आठही जिल्ह्यातील भुजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास ही पातळी २.७९ टक्क्यांनी वाढली असून सरासरी २.०५ टक्क्यांची तूट कायम राहिल्याची नोंद घेण्यात आलीये.

औरंगाबाद मध्ये २.२१, जालना २.५०, परभणी ३.९४, हिंगोली १.१६, नांदेड १.२१, लातूर ४.३७, उस्मानाबाद ३.८५, बीड ३.१६ अशा प्रकारे एकूण २.७९ जिल्हानिहाय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी पाऊस झाला असला तरीही ५ वर्षाच्या भुजल पातळीच्या तुलनेत १०० टक्क्यांनी वाढ झालेली नाही. डोगर, दऱ्या, उथळ, खोलगट अशी भौगोलिक रचना असल्यामुळे जास्त वाढ झालेली नसून दुष्काळाचे चटके लक्षात घेऊन अमर्याद पाणी दुष्काळाचे चटके या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अमर्याद पाणी उपशावर निर्बंध घालावे. आणि भूजलपातळी टिकून त्यात सतत वाढ करण्यासाठी पुढाकार घेणे अनिवार्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *