महाराष्ट्र

औरंगाबाद जिल्ह्यामधील १७ शाळा होणार आदर्श मॉडेल शाळा

Share Now

महाराष्ट्रातील सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी राज्य सरकार मार्फत ४८८ शाळांची आदर्श शाळा मॉडेलमध्ये निवड करण्यात आली. यात औरंगाबाद जिल्ह्यामधील १७ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ४८८ शाळांसाठी ४९४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.राज्य सरकारने शाळा बांधकामासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे.
औरंगाबादमधील या शाळांची आदर्श शाळा मॉडेलमध्ये झाली निवड – जि.प. मुलींची प्रा. शाळा लासूरगाव,जि.प. शाळा सुदामवाडी,जि.प. शाळा पोखरी,मनपा शाळा नारेगावजि.प. प्राथमिक शाळा : गाडीवाट,शासकीय विद्यानिकेतन,जि.प. प्राथमिक शाळा डोमेगाव,जि.प. प्राथमिक शाळा जैतापूर,जि. प. प्रा. प्रशाला बाजारसावंगी,जि.प. शाळा वरवंडी तांडा, जि.प. शाळा ढोरकीन, जि.प. शाळा जळगाव मेटे,जि.प. शाळा केऱ्हाळा, जि.प. शाळा सोयगाव, जि.प. शाळा सोयगाव,जि.प. शाळा बोरसर.
आदर्श शाळा योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या,संगणक कक्ष,virtual क्लास रूम, आकर्षक इमारत, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा,मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह आणि इतर काही सुविधा उपलब्ध होणार आहे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की शासकीय शाळांचा चेहरा बदलण्याच्या उद्देशाने या आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *