Uncategorized

औरंगाबाद हवाला रॅकेट ; त्या दोन डायरीत कोट्यवधींच्या नोंदी

Share Now
चेलीपुरा भागातील सुरेश राईस किराणा दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात ‘हवाला’च्या माध्यमातून आलेले १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले. . या दुकानातून मागील अनेक दिवसांपासून हवालामार्फत व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत हवालाच्या कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने चेलीपुरा भागातील किराणा व्यापारी आशिष रमेशचंद्र साहुजी यांच्या सुरेश राईस किराणा दुकानावर मंगळवारी सायंकाळी छापा मारून १ कोटी ९ लाख ५० हजार रु. व दोन डायऱ्या जप्त केल्या. या डायन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ‘पीएम’ नावाच्या एजन्सीसाठी सावजी हे काम करीत होते. मोबाईल फोनवर येणाऱ्या कोडच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे टोपणनाव लिहून पैसे दिले जात होते. तसेच पैसे जमा करण्यात येत होते. या व्यवहाराची अधिकृतपणे कोठेही नोंद करण्यात येत नव्हती.
डायरीत होणारी नोंदच अधिकृत होती, असेही पुढे आले आहे. दरम्यान, आशिष सावजी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिसांनी पैसे, डायन्यांसह मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून दिले.
सावजी यांचा अधिकृतपणे जबाब नोंदवून पोलीस त्याचा सविस्तर अहवाल आयकर विभागाला देतील. त्यानंतर आयकर विभाग नागपूर कार्यालयाच्या परवानगीने जप्त केलेले पैसे बँक खात्यात जमा करतील. त्यानंतर सावजींकडे पैशाच्या स्त्रोताविषयी चौकशी करतील, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
– हवालाचा व्यवहार संभाळणाऱ्यांना शक्यतो अर्धा टक्का कमिशन संबंधित व्यवहारावर मिळते, अशी माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न असल्याचे समोर छापण्याच्या अटीवर दिली.
– सावजी यांनी पोलिसांच्या छाप्याविषयी एजन्सीला लागतात. त्यासाठी कळविल्यानंतर त्यांनी हात वर केल्यामुळे त्यांना धक्का बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *