VIDEO | पेट्रोल बॉम्ब टाकून सीआरपीफ कॅम्पवर हल्ला, जम्मू काश्मीर येथील घटना
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला केला आहे. हल्ल्या नंतर तो व्यक्ती तेथून पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, व्हिडिओ मध्ये तीन जवाण निडरतेने आग विझवताना दिसत आहे.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकून घातपात करायचा प्रयत्न केला. मंगळवार, २९ मार्च रोजी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
पेट्रोल बॉम्ब टाकून सीआरपीफ कॅम्पवर हल्ला pic.twitter.com/QXFtvr5xc6
— Vivek sudhakar sathe (@Theyout69032197) March 30, 2022
व्हिडिओमध्ये दोन पादचारी रस्ते दिसत असून रस्त्यावर वर्दळ दिसत आहे. अशातच एक बुरखा घातलेली व्यक्ती कॅम्पजवळ येते आणि रस्त्याच्या मधोमध थांबते. सोबत असलेल्या पिशवीतून ती काहीतरी बाहेर काढते आणि कॅम्पमध्ये फेकते. त्यानंतर त्या वस्तूचा भडका उडालेला दिसून येत आहे. त्यानंतर मात्र, ती व्यक्ती लगेच घटनास्थळावरून पळ काढते. भीतीने नागरिकही पळताना दिसून येत आहेत.