परळीत विवाहितेवर अत्याचार, दोन नराधमांना अटक
बीड तालुक्यातील एका गावात चौघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असतानाच परळी तालुक्यातही दोन नराधमांनी एका महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना २७ एप्रिल रोजी समोर आली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केले आहे.
हेही वाचा :- PSI भरती घोटाळा ; भाजप महिला नेत्या दिव्या हागारगीला पुण्यातून अटक
परळी तालुक्यातील मिरवट येथील शेतातील वस्तीवर एक कुटुंब कामाला आहे. तेथे एक महिला घरात एकटीच असल्याचे पाहून २७ एप्रिल रोजी सज्जन मुकिंदा तिडके (वय ३८, रा. भोगलवाडी, ता. धारूर) व अंगद केशव भदाडे (४०, रा. मिरवट, ता. परळी) यांनी मारहाण करून बळजबरीने आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देखील पीडितेला दिली.
घडलेला सर्व प्रकार पीडितेने तिच्यावर बेतलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री साडेआठ वाजता तक्रार दिली.
त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी भेट दिली. दरम्यान, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी तपासचक्रे गतिमान केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.
“पाच दिवसांची पोलीस कोठडी दोन्ही आरोपी सज्जन मुकिदा तिडके व अंगद केशव भदाडे यांना गुरुवारी परळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी दिली.”