महाराष्ट्र

आमदार खासदार असले म्हणून काहीही करण्याचे स्वातंत्र्य नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Share Now

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावर शिवसेना देखील आक्रमक झाली आहे, काल पासून मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे. आज सकाळी ९ वाजता आ. रवी राणा आणि नवनीत राणा मातोश्री बाहेर येऊन हनुमान चाळीसा पठण करणार होते मात्र अजूनही दोघे बाहेर आले नाहीत.

हेही वाचा :- मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी ; रवी राणा मातोश्रीवर जाण्यास ठाम

राणा यांच्या विरोधात मातोश्री बाहेर तसेच त्याच्या घरासमोर शिवसैनिक घोषणाबाजी करत आहेत. आज सकाळी राणा यांनी पासबुक लाईव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीपवासले पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते, यावर दिलीप वळसे पाटील यांनी देखील उत्तर दिले आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी

शिवसेना कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखावी, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावं. राणा दाम्पत्याला विनंती आहे की कुणाच्या सांगण्यावरुन विनाकारण हंगामा करु नये. त्यांनी घरातल्या घरात काय धार्मिक कार्य करायचं ते करा, कुणाच्या सांगण्यावरुन असा हंगामा नको, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :- फोन टॅपिंग प्रकरण ; संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे ‘या’ बोगस नावाने फोन टॅपिंग

पोलीस प्रशासन आपलं काम आणि जवाबदारी पार पाडेल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती कारवाई पोलीस करतील, आमदार खासदार असले म्हणून काहीही करण्याचे स्वातंत्र्य नाही असे दिलीपराव वळसे पाटील म्हणाले. माझं अद्याप मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालेलं नाही. मात्र सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *